![]() Credit: Bernard Bel
Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नांदगाव / Nandgaon Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः ५२ शिक्षणः नाही मुलगेः २ मुलीः २ माहेरः नांदगाव माहेरचे आडनावः कांबळे सासर -साठेसाई व्यवसाय ः शेती व भात शेती आहे. गरीब डोंगरी संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. अतिशय गरीब कुंटुबात त्यांचा जन्म झाला. त्यांना शाळेत जाण्यास खूप इच्छा होती पण आईने त्यांना शाळेत जाऊ दिले नाही. त्यांच्या आईने त्यांना गुरा मागे लावलं त्यामुळे त्यांची शाळेत जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली. बारा वर्षाच्या असताना त्यांचे लग्न झाले. त्यांचे मालक मुंबईला दगडाचे क्रशर (मशीन) याच्यात कामाला होते. नंतर संप सुरु झाला व त्यातच त्यांची नोकरी सुटली व ते परत गावी अाले व मोलमजुरी करु लागले. १९८० साली त्या गरीब डोंगरी संघटनेत त्या सहभागी झाल्या. त्यावेळी त्यांचा मुलगा तीन वर्षाचा होता. घरची परिस्थितीः दोन खणाचे भिंतीचे घर आहे. आर्थिक परिस्थिती ठीक आहे. | ||