Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: खालापूर / Khalapur District: रायगड / Raygad Gender: F | वयः ७० मुलगे ः २ मुलगी ः नाही विधवा आहेत. व्यवसाय ः शेती घरची परिस्थितीः मजुरी करतात. या गावी एकट्याच रहातात. यांना सवत आहे. एक मुलगा झाला होता तो वारला मग नवर्याने यांच्या चुलत बहीणीशी लग्न केले. तिला दोन मुलगे आहेत. यांची सवत व दोन्ही मुलगे विमानतळावर काम करतात. त्यांना चांगले पगार मिळतात. ती सर्वजण यांना फारसे विचारत नाहीत. या अजूनही गवंड्याच्या हाताखाली काम करता. थोडी शेती आहे ती स्वतःच कष्ट करून करतात. मुलगे भात न्यायला येतात. घर आहे तिथेच रहातात. त्याची देखभाल करतात. गावात कुणी फारसे विचारत नाही. या बाई आम्हा सातआठ जणींना स्वतः त्यांच्या गावी घेऊन गेल्या. त्यांच्या मनात आमच्यासाठी स्वैपाक करावा असे होते. पण पुढे गावच्या माणसांनी पुढाकार घेऊन आम्हाला जेवण केले. या बाईंना त्याचे जरा वाईट वाटले. त्यांचे म्हणणे मी गरीब होते तरी चटणी भाकरी केली असती. त्यांनी काही ओव्या सांगितल्या. सवत आहे. हक्काची मुलेबाळे नाहीत म्हणून यांच्या जिवाला वाईट वाटते. त्याच मुळे कदाचीत त्या गाणी म्हणत असाव्यात. इतर ठिकाणी सुध्दा हाच अनुभव आहे. यांना ६एप्रिल २००४ ला भेटलो व त्यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||