Cast: नवबौध्द / Navbaudha Village: बाचोटी / Bachoti Taluka: कंधार / Kandhar District: नांदेड / Nanded Gender: F | वयः६० मुलगेः ४ मुलीः ५ सवाष्ण शेत नाही. मजूरी करतात या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परिपाठ आहे. लिहीता वाचता येते. रायबोलेंनी आदल्या दिवशी सांगितले की पुण्याच्या बाई येणार म्हणून आंबेडकरांवरील ओव्या कागदावर लिहून काढल्या होत्या. मग कागद बाजूस ठेवून आठवणीतल्या ओव्या सांगितल्या. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||