Cast: नवबौध्द / Navbaudha Village: सोलापूर / Solapur Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ६७ (१४ एप्रिल, १९३४ ला जन्म) मुलगेः३ मुलीः ३ घरची परिस्थितीः नवरा महापालीकेत मुकादम होता. तो दारू पित असे. त्यामुळेच लवकर वारला. सर्व मुले सरकारी नोकरीत आहेत. आता मोठा मुलगा आजारी आहे. या स्वतः दवाखान्यात नोकराणी होत्या. आज १५०० रू पेन्शन मिळते. त्यांना सुईणपण येते. एकपण केस फसली नाही. १९४६ साली बाबासाहेब सोलापूरला आले होते तेंव्हा या सभेला गेल्या होत्या. त्यांच्या घरी त्या वेळचा फोटो आहे. बाबासाहेबांच्या मागच्या रांगेत त्या उभ्या आहेत. त्यावेळी नीळा झेंडा ऊंच धरा दलीताची घटना घडवा/जुन्या रूढीला देऊन टोला जयभीम बोला हे गाण म्हटले होते. १९५० साली महीला मंडळ स्थापले. त्यावेळी शांताबाई दाणी, दादासाहेब गायकवाड, राजभोज, खोब्रागडे, दादासाहेव रूपवते, गवई आले होते. आंबेडकर नगर वसवण्यात यांचा सहभाग आहे. जागा मिळवण्याच्या खटपटी करण्यापासून सगळी मेहनत घेतली. १९६५ साली जमीनीचा सत्याग्रह रिपब्लीकन पक्षाने केला होता त्यात यांच्या महीला मंडळाच्या १५ जणींनी भाग घेतला होता. त्या स्वतः, सोनुबाई उबाळे, ताईबाई शिवशरण, इंदीराबाई, यशोदाबाई, राहीबाई, साळुबाई नळभंडारे, सखाबाई, सुज्ञानबाई, लक्ष्मीबाई, सुघावाई, सुभद्राबाई, भागाबाई, विठाबाई, समाबाई यासगळ्या सत्याग्रहात होत्या. रणसिंगारे पण होते. . तीन महीने शिक्षा झाली. सोलापुरात ८ दिवस, बारामतीत ८ दिवस, मथुरेत ८ दिवस व मग दोन महीने येरवड्याला होत्या. या तुरुंगात होत्या त्यावेळेस शेवटच्या मुलाच्या वेळेस गरोदर होत्या. गंजी पिऊन व पाणी पिऊन दिवस काढले. २२ सप्टेंबर २००१ ला यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||