Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ६५ मुलगेः ४ मुली ः ४ सवाष्ण घरची परिस्थिती ः नवरा म्युनीसीपालीटीत शिपाई होता. यांच्या शेजारी दोन मुलगे रहाता. त्यातील एक दारू पितो. त्याच्या बायकोला या पैसे पुरवतात. ती सून लोकाचे काम करते. ती ९ वी पर्यंत शिकली आहे. वडील पोलीस आहेत. हिचा नवरा सुध्दा पोलीस. सरकारी नोकरीतला म्हणून लग्न केले. पण तो पितो. ही माहेरी जात नाही. एक मुलगा दवाखान्यात कामाला आहे. त्याच्याजवळ वडील रहातात. या म्हणाल्या की जन्मभर जवळ राहीलो पण आता म्हातारपणी लांब रहायची वेळ आली. मी रोज त्या मुलाकडे जाते. नवर्याला जेवायला करते. त्याचे वाईट वाटते. नवर्याची पेन्शन मिळते. खाउन पिउन चांगली परिस्थिती. पण लेकी कडे रहावे लागते. ज्या मुलाकडे नवरा रहातो त्याची परिस्थिती चांगली आहे. हे सांगताना ओवी आठवली. कुणाची घरदार कुणाच्या गायाम्हशी/ धिनाच्या वेळी आत्मा चालला उपाशी. एक मुलगा शेतकी खात्यात शिपाई आहे. चवथापण काम करतो. यांचे दोन मुलगे व एक मुलगी शेजारी रहातात. या मुलीकडे रहातात. यांचे माहेर परिस्थितीने चांगले आहे. आता भाऊ व बहीणी वारले. भाचे चांगले वागतात. पुष्कळ गाणी येतात. या सुईण आहेत. लेकी सुनांची बाळंतपण केली. धाकट्या सुनेला मूल उशीरा झाले. ती दवाखान्यात गेली. म्हणजे सासूने दवाखान्यात नेली. त्या म्हणाल्या मूल उशीरा झाले. तिच्या माहेरच्या माणसांनी काही म्हणू नये. नाहीतर बाळंतपण करणे अवघड नव्हते. २२ सप्टेंबर २००१ ला यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||