Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ७५ मुलगेः ३ मुलीः ५ विधवा माहेर ः आपशिंगी सासर ः पिप्री दोन्ही या लहानपणापासून सोलापुरात रहातात. लग्न खूप लवकर झाले. तशा सोलापुरातच रहातात. घरची परिस्थितीः परिस्थिति चांगली होती. नवरा जुन्या गिरणीत कामाला होता. गिरणी चालू होती तोपर्यंत गिरणी बंद पडल्यावर हाल झाले. नवरा मजुरी करी. या मोठ्या श्नीमंत मुसलमानांची घरे झाडणीची कामे करत. प्रसंगी दुष्काळात भाकरी मागून मुले जगवली. एक मुलगा सार्वजानिक बांधकाम खात्यात कामाला आहे. एक बार्शीत अॉफिसमधे शिपाई आहे, एक कर्हाडला मजुरी करतो. दोन मुली उस्मानाबादला असतात. एक अपशिंगीला असते. एक इथेच शेजारी रहाते. जवळ असणारी सून नीट बघत नाही म्हणून ही मुलगी इथेच राहीली आहे. एक मुलगी आंधळी आहे. दोन सुना स्वतःच्या भाच्या म्हणजे भावाच्या मुलीच आहेत. भाऊ पण शेजारी रहातो. या भावाशी बोलत नाहीत. एक मुलगी नणदेच्या मुलाला दिली आहे. या बाईंना कमी दिसते. आता दळण नाही म्हणून गाणी पटापटा आठवत नाहीत. जात्यावर बसल्यावर सुई ओवल्यावाणी गाणी आठवतात. गाणी माहेरी आईकडून व सासरी जावेकडून शिकल्या. गाणी देण्यामधे उत्साह वाटत होता. या सुईण आहेत. पुष्कळ बाळंतपणे केली. सुनांची, लेकींची बाळंतपणे केली. २२ सप्टेंबर २००१ ला यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||