Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ५५ मुलगे ः ३ मुली ः २एक मुलगा वारला, सवाष्ण, माहेर ःमंगरूळ तुळजापूरजवळ घरची परिस्थितीः नवरा हवालदार. अतिशय संशयी वृत्ती. या बाई तरूणपणी सुंदर होत्या. आज सुध्दा नवरा झळतो. मारतो. संशय खातो. त्यांची नणंद भीमबाई सिध्दगणेश. त्या पण कार्यकर्त्या. त्या आपल्या भावाला काही सांगू शकत नाहीत. तो म्हणतो तुझ्या माहेरी बोलण्याचा काही संबंध नाही. लग्न करून दिले. लोकाकडे दिली.तिकडे मर. या बाई आता अजारी आहेत. सगळे दात काढले. तीन वर्ष झाली जखमा भरत नाहीत. आता गिळायला त्रास होतो. गाणी सांगण्याची हौस वाटत होती. गाणी माहेरी शिकल्या. नळदुर्ग त्यांच्या माहेरच्या जवळ आहे. तिथे या लहान असताना दंगा झाला होता. त्यावेळी काही जणींनी गाणी रचली होती. मुसलमान बाया आपले दुःख आंबेडकरांना सांगतात त्या बद्दल या ओव्या आहेत. त्यापैकी काही यांच्या लक्षात आहेत. २२ सप्टेंबर २००१ ला यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||