Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F Songs by Jori Savitra (168) | वयः ३० शिक्षण ः नाही मुलगा ः नाही मुलगी ः नाही (दीराची २ मुले सांभाळतात) माहेर ः भालगुडी व्यवसाय ःशेती ३ एकर. दुसवट्याने दुसर्याची शेती करतात. मुख्य पिकं तांदूळ,गहू . १२ पोती भात होतो. जोडधंदाः दूध व्यवसाय. २ बैल,१ गाय आहे. माहेरी शेजारणीकडून, सासरी सासूकडून ओव्या शिकले. हळदीला इत्तर दळायला (नेहमीचे दळण) बसताना बरोबरीची स्त्री असली तर गाण म्हणावंस वाटतं .इरीशिरीने गाणं म्हणते त्याशिवाय दळण दळल्यासारखे वाटत नाही. देवाधर्माची,पोरांची,मालकाकाहून,भावाहून लेकीहून गाणी म्हणते. देवाची,मालकाहून भावाहून, आईची म्हटलेली गाणी विशेष आवडतात. गाण्याची आवड होती मग ती गाणी मी लक्षात ठेवायची. स्वत; गाणं तयार करते. डोक्यात सतत विचार चालू असतो त्यातूनच नवीन गाणे रचते. लगीन सराईला लग्नाची गाणी आठवतात. नेहमीच्या दळणाला नवरा,लेक यांची गाणे रचते. ज्यांनी शिकवलं त्यांचेच शब्द म्हणते नाहीतर कधी फरक करते. दुसर्यांना गाणं शिकवते. भालगुडीहून एक गळा आणला होता तो डोंगरगावात सगळीकडे केला. माझं गाणं ऐकायला शेजारच्या बायका यायच्या. मला गाणं येत नव्हतं तर आमच्या सासूच्या अनुभवावरुन शिकले. ती म्हणायची मुक्यानं दळण दळल्यावर नवर्याला भाकरी देवू नये. मुकयाचं दळण नाही मुक्यानं दळावं जात्यावर दळण नाही दळाव मुक्यानी धन भर गोत दिलं विठ्ठल सख्यानी. लग्नाच्या गळ्याप्रमाणे सीतेच्या गाण्याचा गळा, भूपाळीचा गळा वेगळा आहे. हल्लीच्या मुलींबाबत त्या म्हणतात हल्लीच्या मुलींना जात्याकडे वळायला मार्ग नाही त्यामुळे त्यांचा काहीच दोष नाही. हल्ली दळण कांडण जात्यावर होतच नाही. घरची परिस्थितीः घर दोन खणाचे पे दगडी बांधकामाचे आहे. एकत्रित कुटुंब,खाऊनपिऊन सुखी. बाई सामाजिक कार्यकर्त्या असून गरीब डोंगरी संघटनेत गेली १० वर्षे काम करत आहेत. महिलांचे वैयक्तिक प्रश्न सोडवितात तसेच परिसरात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा प्रभाव आहे. हल्लीच्या मुलींबाबत त्या म्हणतात हल्लीच्या मुलींना जात्याकडे वळायला मार्ग नाही त्यामुळे त्ंाचा काहीच दोष नाही. हल्ली दळण कांडण जात्यावर होतच नाही. | ||