Database design: Bernard Bel
https://ccrss.org/database/songs.php?song_id
= 30861
[Login]

Project  ♪♪ सांगते बाई तुला - Sāṅgatē bāī tulā - I tell you woman! ♪♪

Read project statement
With the support of People’s Archive of Rural India (PARI)
Source documents produced by GDS / CCRSS
Devanagari to Diacritic Roman conversions with TechWelkin

Creative Commons
CC license

grindmill.org

  Recordings: recordings.php
 • Performers: performer.php
 • Locations: villages.php
 • Classification: classification.php
 • Groups: groups.php
 • Glossary: glossary.php
 ⚲ Search: search.php

Grindmill songs of Maharashtra — Song #30861 by Polekar Saru

Village: घोल - Ghol


D:X-3.2ci (D10-03-02c01) - Mother attached to son / Taking pride in son / When son keeps cows / Playing flute

[26] id = 30861
पोळेकर सरु - Polekar Saru
मव्हरी पव्याच येड माझ्या गोविंदाला पवा बत्तास चाळ्याचा
पावा बत्तास चाळ्याचा त्याला वाजवाया पूत्र कोण्या गवळ्याचा
mavharī pavyāca yēḍa mājhyā gōvindālā pavā battāsa cāḷyācā
pāvā battāsa cāḷyācā tyālā vājavāyā pūtra kōṇyā gavaḷyācā
My son Govinda is extremely fond of Mavhari flute, his flute can play in thirty-two different tunes
Which cowherd’s son is he
▷ (मव्हरी)(पव्याच)(येड) my (गोविंदाला)(पवा)(बत्तास)(चाळ्याचा)
▷ (पावा)(बत्तास)(चाळ्याचा)(त्याला)(वाजवाया)(पूत्र)(कोण्या)(गवळ्याचा)
pas de traduction en français
Notes =>महुरी- सोमदेवांने आपल्या ग्रंथामध्ये एक पत्रिकायुक्त वाद्याचे विवरण दिले आहे ज्यांस मुहुरी असे संबोधले असून त्याची निर्मिती काष्टपासून केलेली असून लांबी २८ अंगुल दिली आहे. मधुकरी वाद्य काष्ट निर्मित असल्याने त्याचा ध्वनी अत्यंत मंजुळ व मधुर सांगितला गेला आहे. याची आकृती काहला वाद्या प्रमाणे होती. मतंगमुनिंनी आपल्या ग्रंथ बृहदेशीमध्ये यास मद्वरी व मुहरी या नावाने संबोधले आहे.
(लेखक/भाषांतरकारः शाम्ईदेव/- प्रा. ग. ह. तारळेकर. पुस्तकाचे नावः- संगीत रत्नाकर, भाग २, अध्या ५ ते ६. अध्याय ६ वा. प्रकाशक- सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मंत्रालय, मुंबई
पावा- बांबुपासून निर्मिती. बांबूच्या पानांनी लपेटलेला असून तो लोकरीतीप्रमाणे वाजवला जातो. शार्भ्डदेवांच्या मते पाविका बांबूची असून ती १२ अंगुळे लांबीची करावी. तिची जाडी अंगठ्याएवढी असून मध्ये आपल्या करंगळीच्या टोकाएवढे भोक ती धारण करते. लोकांनुसार हिचे एक फुंकण्याचे भोक असते व पाच भोके स्वरसिध्दीसाठी असतात.
Mahuri (Mavhari, Mavari) - A brief description) -An instrument which is called Mahuri, about which Somdev has given an explanation in his book. It is created from wood and is twenty-eight Anguli (the measure of a finger’s breadth) long.
(Source - Given in details in the Marathi note)
Pava (Flute) - (A brief description) - It is made from bamboo, wrapped with bamboo leaves. It is played according to the popular tradition. According to Shabhrddev its length should be twelve Anguli (the measure of a finger’s breadth) long and its thickness as big as the thumb. It has a hole for blowing and five holes for playing the notes.

Valid CSS! Valid HTML!
Sections of semantic classes:
  1. Playing flute