Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गायमुखवाडी / Gaymukhwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Asha (70) ◉ | वयः२५वर्षे शिक्षणः नाही मुलगाः१ मुलगीः१ माहेरः तैलबैला माहेरचे आडनावः मेणे व्यवसायः शेती. एक एकर शेती असून दुसर्याची शेती अर्धेलीने करतात. तांदुळ, नाचणी, वरई ही पीके घेतात. ४-५ पोती भात होतो. घरी आई, चुलत्या, मावळणी गाण म्हणायच्या त्यांच गाण ऐकुन मी शिकले. पहिल्यापासुन तोंड चालूच आहे त्यामुळे जात्यावर बसल की गाण फुटत. एखादा नवीन शब्द असला ना मग पाण्याला जाताना, येता-जाता घोकत राहते. स्वतः गाण रचते. रिकाम बसल्यावर गाण म्हणते. आई, वडील,भावावरची गाणी जास्त आवडतात. भांबर्डे गाव गाण म्हणण्यासाठी प्रसिध्द आहे. घरची परिस्थितीः तीन खणाचे मातीचे घर असुन कुटुंबाचे पोट भरेल इतपत उत्पन्न. | ||