Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गायमुखवाडी / Gaymukhwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Ana (60) ◉ | वयः५५वर्षे शिक्षणः नाही मुलगेः २ मुलीः ३ माहेरः जांभुळकराचे बार्पे माहेरचे आडनावः जांभुळकर व्यवसायः शेती व मोलमजुरी. चार एकर शेती असून भात, नाचणी, वरई ही पीके काढतात. दहा पोती भात होतो. दोन बैल,काही कोंबड्या आहेत. ऐकून ऐकून माहेरी गाण शिकले. दळण लवकर सरत म्हणुन जात्यावर गाण म्हणते. जात्यावर बसल की आपोआप गाण येते. घोकावे लागत नाही. जात्यावर बसले म्हणजे गाण रचते. शिकवणार्याला तुझा शब्द चुकला म्हणून दुसरे गाण म्हणते. दुसर्यांना शिकवते. आपली पोरबाळ आहेत त्यांच्या आवडीने गाण म्हणते. लेकाहून जास्त गाण म्हणते. भजना अभंगाच आम्ही नाही म्हणत. भाजीपाला आण शकंतला अशी आत्ताची गाणी म्हणत नाही. विधवा आहेत. घरची परिस्थितीः दोन खणाचे कुडाच्या िंभतीचे घर आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. | ||