Cast: चर्मकार / Charmakar Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: वरसगाव / Warasgaon Gender: F Songs by More Sita (23) | वयः ४५ शिक्षणः नाही मुलगे ः४ मुलगीः १ व्यवसायः शेती दोन एकर. (यांचे कुटुंब वरसगाव धरणातून उठून दौंड तालुक्यात आले आहे. शेत जमीन मिळून उपयोग नाही. त्या ज्या भागातून उठून आल्या त्या सर्व लोकांना एका ठिकाणी जमीन मिळाली नाही. त्यामुळे पाइप लाइन घेणे, मोटर बसवणे अशा गोष्टी करता येत नाहीत. शेतीला भांडवल नाही. ही लोक ज्या भागात रहात होती तेथील पाणी धरण बांधून अडवले, यांना उठवले पण जेथे वसवले त्याठिकाणी पाणी देण्याची खबरदारी घेतली नाही. जमिनी मुरमाड, उंचसखल अशा दिल्या. ज्या गावात पूर्वी रहात होते त्या गावातील लोकांना एकत्र गावठाण दिले नाही. या सर्व अडचणींमुळे या कुटुंबाला मजुरी करुन जगावे लागत आहे. परकेपणाची भावना सतत मनात बाळगूनच ही लोक रहातात.) ओव्या आई कडून शिकल्या. | ||