Cast: महादेव कोळी / Mahadev Koli Village: / Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F Songs by Umbre Yashoda (29) ◉ | वयः ३७/३८ शिक्षणः नाही मुलीः २ माहेरः ढाक बहीरी (जि. रायगड) सासरः राजमाची वयः ४५/४६. मुलगेः ४ माहेरः दुधावरे या बाई ओव्या आईकडे शिकल्या. व्यवसायः शेतीः स्वतःची नाही. दुसर्याची शेती करतात. त्यावर नाचणीचे पीक घेतात. घरची परिस्थितीः यांचे घर गावातील इतर लोकांसारखे मोठे आहे. त्यांना त्यांच्या सासूने घराबाहेर हकलून दिले. त्या वेळी मुले लहान होती. त्यांनी स्वतः व नवर्याने कष्ट करुन हे घर उभारले. आता त्यांनी घरामधे स्वतंत्र न्हाणीघर बांधले आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय होते. चिकन करणे, वागण्यात चेंज करणे असे इंग्लीश शब्द त्या वापरत होत्या. त्यांचा मोठा मुलगा मतीमंद आहे. दुसरे मुलगे शिकतात. गावात स्वयंसेवी संस्थेचा तायडे नावाचा माणूस येतो. तो गावातील काही मुले शिक्षणासाठी मुंबईस नेतो. या बाईंच्या एका मुलास नेले होते. तो दहावी पास झाला.आता गावी आला आहे. गावातील सर्व कुटुंबे व त्यांची मुले हे एकाच कल्पनेने पछाडले आहेत आणि ती म्हणजे आपल्या घरी पर्यटक कसे येतील. ते सर्वजण आम्हांला पर्यटकच समजत होते. या बाईंच्या मुलाने त्यांचे नावाचे कार्ड आम्हाला दिले. परत गावी गेलो तर आमच्याच घरी या असे परत परत सांगण्यास तो मुलगा विसरला नाही.गावात चालू असलेली राजकीय व सामाजिक चर्चा यांना थोडीबहुत ठाऊक होती. यांच्या भावाच्या मुलीस दसर्याच्या सुमारास सासरच्यांनी वीष देवून मारले म्हणून गाणे म्हणावे वाटत नव्हते. यांची मुलाखत व ओव्या १५,१६मार्च १९९७ मधे घेतली. त्यांच्या गावी गाणी टेप केली. | Age: 46; Sons: four; Mother’s place: Dudhavare (taluka Mawal, dist. Pune); cast Mahadev Koli Land: she is in the same situation as Renuka. The family does not own land. they cultivate other’s land. We are not clear about the legal status. Her house is large. She has built the bathroom with a proper door to it so the people can take bath behind the close door. (In the villages men generally take bath in the open, and for women a space is prepared inside the house which is half open without a door.) She is rather proud of her bathroom as well as the large house. She told us: “My mother-in-law threw my husband and myself out of her house, the house belonging to the joint family. My husband and me we built this new house with our own labour, where we are residing now.” The whole village has come under the spell of establishing contacts with the tourists from Bombay and Pune. One of her sons gave us a printed visiting card. The influence of tourism is evident on their language. Yashoda was confidently using English words like ’chicken’, ’change’ etc. Her eldest son is retarded. Other three are taking education. One of her sons was staying in Bombay for his education. He has passed tenth examination. A young NGO volonteer from Bombay regularly visits the village. Yashoda’s son accompanied him to Bombay. Other two sons are continuing their education in the village. She has learnt grindmill songs from her mother. When we visited her she was relectunt to sing. She said her niece (brother’s daughter) was poisoned by her in-laws and she died. In the villages there is a custom that if some close relative dies then women do not sing at least for one year. She was aware of the facts and discussions going on in the village on political and economic front. | |