Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Hausa (45) ◉ | वयः ३५ वर्षे शिक्षणः नाही मुलगाः नाही मुलीः ३ माहेरः गायमुखवाडी भांबर्डे माहेरचे आडनावः पवार व्यवसायः शेती, मोलमजुरी. दोन एकर शेती आहे. तांदुळ, नाचणी, वरई ही पीके काढतात. २-३ पोती भात होतो. आई म्हणायची त्यातले दोन-चार शब्द ध्यानात ठेवायची. तेच आता येतय. कुठून रानातून आल, आपल्याला पीठ नाही तर मग दळताना गायच. दळल्याशिवाय अंग हालक होत नाही. ते आमच इंजेक्शनच आहे. दळल्याशिवाय आम्हाला बरच वाटत नाही. जस शब्द फुटल तस गाण म्हणत असते. ज्या टायमाला माणूस मरल त्याच टायमाला ते गाण जाईल. त्याशिवाय ते जायच नाही. बरोबर ध्यानात येत. स्वतः गाण तयार करीत नाही. ते जुनच आहे. अंगच गाण आम्हला येत नाही. देवाच असल तर गाण बनवतो. भावाचा, देवीचा विषय लय आवडतो. घरची परिस्थितीःदोन खणाचे मातीचे घर आहे. | ||