![]() Credit: Andréine Bel
Cast: मराठा / Maratha Village: ताडकळस / Tadkalas Taluka: पूर्णा / Purna District: परभणी / Parbhani Gender: F Songs by Ambore Gangu (27) ◉ | वयः५६ शिक्षण: नाही मुलगे: नाही मुलगीः १ व्यवसायः १४ एकर शेती ऊस कापुस भुईमुग ज्वारी हि पिके घेतात. विधवा आहेत घरची परिस्थितीः वाईट आहे या बाईंना महारोग आहे त्यांना दहा वर्षापासुन रोग झाला आहे हाताची व पायाची बोट झडली आहेत हा रोग त्यांच्या आजीला झाला होता त्या आजीजवळ झोपत त्यामुळे त्यांना हा रोग झाला त्यांचे लग्न ११ व्या वर्षी झाले त्यांचा नवरा त्याच्याच गावाचा होता त्या माणसाचे अर्धे वय झाले होते. लेकांनी त्याचे लग्न गंगुबाईशी लावुन दिले. गंगुबाईंना तीन मुली झाल्या पण त्यातील दोन मेल्या व एक जगली. आता त्या देवळात राहातात. तिथे रात्री भजने होत त्यात त्या सहभागी होतात. बरीच भजने सुध्दा त्यांनी दुःखातुन म्हटली आहेत ७/ ४/१९९६ ला मुलाखत व ओव्या घेतल्या. | ||