Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: कळमनुरी / Kalamnuri District: हिंगोली / Hingoli Gender: F | वयः ५५ मुलगाः १ मुलीः ३ माहेरः माकडाच उपळे सासरः आता नांदेड व्यवसायः प्राध्यापिका, वसंतराव नाईक महाविद्यालय, अप्पर पैनगंगा कळमनुरीच्या शेजारी ज्या १८ गावात छोटे धरण झाल्याने त्यांचे पुनर्वसन झाले त्यागावातील ३० महार महिलांकडून १९८१ साली ओव्या गोळा केल्या. ही गाव कळमनुरी ते हिंगोली या परिसरातील आहेत. पूर्वी हा भाग परभणी जिल्ह्यात यायचा. आता नव्याने निर्माण केलेल्या हिंगोली जिल्ह्यात हा भाग मोडतो. या ओव्या गोळा करताना स्टेट बँकेत काम करणार्या त्यांच्या यजमानांची त्यांना मदत झाली. धरणातून उठणार्या व्यक्तींना काँपेन्सेशनची मिळणारी रक्कम देण्याचे काम बँकेतील अधिकारी म्हणून चंद्रकांत औरादकर करत. त्यांनी या महार स्त्रिंयांकडून ओव्या गोळा करण्यास आपल्या पत्नीला मदत केली. त्यांच्या सासूबाई लतीका औरादकर यांच्या पण ओव्या यांनी गोळा केल्या आहेत. सासुबाईंच्या आई नागीणबाई निलंगेकरांच्या ओव्या पण त्यांनी गोळा केल्या आहेत. दोन मुलींची लग्न झालीत. नांदेड पण मूळ गाव शहाजानी औराद म्हणून औरादकर नाव पडले. ता. जि. उस्मानाबाद या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी मराठवाड्याच्या लोकगीतातील स्त्री या विषयावर मराठवाडा विद्यापिठाला १९९० साली प्रबंध सादर केला. त्यांना त्याच वर्षी डॉक्टरेट मिळाली. तो निबंध त्यांनी दमयंती नारायण पोद्दार या माहेरच्या नावावर सादर केला होता. | ||