![]() Credit: Andréine Bel
Cast: मराठा / Maratha Village: सावरगाव / Savargaon Taluka: माजलगाव / Majalgaon District: बीड / Beed Gender: F | वयः६० शिक्षण ः नाही मुलगे ः ३ मुलगीः नाही व्यवसायः १४ एकर शेती ऊस कापुस भुईमुग ज्वारी हि पिके घेतात. विधवा आहेत घरची परिस्थितीः चांगली आहे धरुबाई व पारुबाई ह्या बहिणी बहिणी आहेत. पारुबाईंची ही धरुबाईनसारखी दोन लग्न झाली पारुबाईंना त्यांना शेजारच्या गावात दिले पण त्यांना तिथे शेती नाही पण भावाने त्यांना चौदा एकर शेती दिली पण मुल ती सारखी विकु असे म्हणतात. त्या सुईणी पण आहे. यांचा नवरा मेल्यावर त्यांनी दुसर्या माणसाशी म्होतर लावला व त्याची प्रथम पत्नी वारली होती त्यांना एक मुलगा होता त्या मुलाला धरुबाईनींच लहानाचे मोठे केले तो सावत्र मुलगा त्यांच्याशी चांगला वागतो. यांची मुलाखत व ओव्या २-७/२/१९९७ ला घेतली. | ||