Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dighe Kanta (55) | वय ः३२वर्षे शिक्षणः नाही अक्षर ओळख आहे. मुलगेः२ मुलीः२ माहेरः कुंभेरी माहेरचे आडनावः दाभाडे व्यवसायः शेती. घरी पाच एकर भात शेती असून भात, नाचणी, वरई ही पीके काढतात. साधारणपणे पाच पोती भात होतो. ६ कोेंबड्या आहेत. २ बैल माहेरी आई आणि भावजयी कडुन ओव्या शिकले. जात्यावर बसल की मुक्याने दळण सरत नाही. जात्यावर ओवी गायली नाही तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे. जात्यावर बसल की गाण उफाळुन येत. शब्द मनात रहावा यासाठी सारख घोकत रहातात. स्वतः गाणी रचतात. कधी कधी दुसर्याच्या गाण्यातील शब्द बदलुन गाणे बनवतात. पोरींना गाणी शिकवतात. काय उंडग्या सारख काय जणु या शब्दाने गाणे न येणार्या पोरींना बोलतात. आहेव मरण, लेकीचे, भरताराचे विषय गाणे म्हणण्यासाठी अधिक आवडतात. १९९५ सालापासून गरिब डोंगरी संघटनेचे काम करते. घरची परिस्थितीःआर्थिक परिस्थिती बेताची आहे. मातीत बांधलेले तीन खणाचे घर आहे. गुरामागे जाण्यासाठी घरकामासाछी मोठ्या मुलीला शाळेतुन काढले आहे इतर तीन मुले मात्र शाळेत जातात. या बाई गरीब डोंगरी संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत | ||