Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: मराठा / Maratha Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: पौड / Paud Gender: F | वयः ४३ शिक्षणः ७ वी. मुलेः २ मुलीः १ माहेरः पिरंगुट. व्यवसाय शेतीः ५एकर. पिकेः तांदूळ,गहू. ५-६ पोती भात होतो. जोडधंदा ः किराणाचे दुकान, रेशन दुकान. माहेरी आईकडून,सासरी आल्यावर सासूच्या माहेरी भूकूम येथे काही ओव्या शिकले. घावणसाठी तांदूळ धलताना , तांदूळ लावताना ,डाळीचं पिठ दळताना, लग्नासांठी गाणं गाते. बरोबरीच्या बायका असल्या तर गाणं म्हणावसं वाटतं. गाणं म्हणण्याचं कारण सांगताना बाई म्हणतात मुक्याच्या दळणाची भाकर पुरुषाने खावू नाही.भावाच्या बहिणीने ओव्या गाईल्यानी राहू नाही. बहिण-भावडाची,मायलेकाची जास्त करुन पुरुषांविषयीच गाणी म्हटली जातात. भावजयीवर म्हणताना टिकात्मक ओवी म्हणतात. बहिण-भावंडाच्या,मुलाच्या ओव्या जास्त करुन आवडतात. भावाचं,मुलाचं कौतुक करण्यासाठी आत्मीयतेने,आवडीने गाणं म्हणते. शेतात काम करताना दुसरा काही विचार करण्याऐवजी गाणंच गुणगुणत राहायचे. त्यामुळे आठवण राहते. ज्यांनी शिकवलं त्यांच्या शब्दात बदल करत नाही. अगदी कोणी घेऊन बसून शिकवत नाही .ज्यांना आवड असते ते येऊन ऐकतात,ध्यानात ठेवतात. नवीन गाणी जोडून म्हणत नाही. चांगला हेल लावला होता अशा प्रतिक्रिया दुसरे व्यक्त करतात. ज्यांना गाणं म्हणता येत नाही त्यांना बाई म्हणतात 'गळा नाही वळा अन गाव केला गोळा'. चार दोन गाणी म्हणा म्हणतात. ह्या नव्या पिढीला काय येतं.आता सगळं बुडणार आहे. असे नव्या पिढीबद्दल सांगतात.लग्नाच्याच गाण्याची चाल वेगवेगळी असते दुसर्या कोणत्याच विषयाला दुसरा गळा नसतो. घरची परिस्थिती ः घर ३ खणाचे बांधलेले आहे. घरात टी. व्ही असून खाऊनपिऊन सुखी कुटुंब आहे. एकत्र कुटुंब आहे. बाईनी गरीब डोंगरी सघंटनेत ११ वर्ष काम केले असून गेली ३ वर्ष मुळशी तालूका महिला काँग्रेस (आय) च्या अध्यक्ष आहेत. बाई सामाजिक कार्यकर्त्या असून परित्यक्तांच्या संदर्भात,वैयक्तिक भांडणे मिटविणे,पाण्याचा प्रश्न इत्यादी विषयांवर काम करतात. | ||