Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: वाळवा / Walwa District: सांगली / Sangli Gender: F | वयः ३० मुलगाः १ मुलगी ः १ व्यवसाय ः शेती आहे. आता या कोल्हापूरला रहातात. यांचे यजमान काम करतात. या भावांच्या शेजारी रहातात. या स्वतः लागेल त्या वेळी काम करतात. सध्या त्या सरकारी इस्पितळात काम करतात पण ते कायमचे नाही.घरी सांगलीत इतर दीर व जावा रहातात पण यांच्या मतानुसार ते जमवून घेत नाहीत. या प्रकाश आंबेडकरांच्या गटात काम करतात. त्यांनी ज्यावेळेस महाराष्ट्र पातळीवर महीला मेळावे घेतले त्यावेळी त्या ७०० ते ८०० महीला घेऊन गेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार आगगाडीचे चार ते पाच डबे यांच्यासाठी असतात त्यातून फुकट प्रवास करता येतो. याच आम्हाला वाकरेला घेऊन गेल्या होत्या. यांना आम्ही प्रथम ९.२.२००४ ला भेटलो. मग परत १७.४.२००४ ला भेटलो. त्या दिवशी गाणी घेतली | ||