Cast: नवबौध्द / Navbaudha Village: मालवण / Malvan Taluka: मालवण / Malvan District: सिंधुदुर्ग / Sindhudurg Gender: F | वय ः २७ शिक्षण ः नाही मुलगे ः नाही मुलीः २ व्यवसाय ः मोलमजुरी करतात. या मालवण येथील बौध्दवाड्यात रहातात. यांचे पती काही काम करत नाहीत. दोन मुली आहेत. दोन मुलींवर अॉपरेशन करून घेतले. मुलगा काय विचारणार असा त्यांचा प्रश्न होता. त्यांना गाण्याची फार आवड आहे. त्या म्हणाल्या की लहानपणी सिनेमा बघितला तरी गाणी लक्षात रहात गोष्ट नाही. आता परिस्थितीने डोक्याला त्रास होतो. संसाराची तर्हा झाली. काळजी मागे लागली तरी आजही मी गाणी रचते. यांची मुलाखत व गाणी ७.२.२००४ ला घेतली | ||