Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: चिकोडी / Chikodi District: बेळगाव / Belgaon Gender: F | वय ः ३५ मुलगेः३ मुलगीः १ माहेरः कोल्हापूर सासर ः मामकापुर व्यवसायः शिवणकाम यांचे यजमान शिवणकाम करतात. मोठा मुलगा बेंजो वाजवतो. मधला एका ठेकेदाराकडे टेंपररी नोकरीला आहे. धाकटा शिकतो. मुलगी शिवण शिकते. यांचे यांचे यजमान आपले गाव सोडून सासरवाडी रहातात. यांचे घर ज्या भागात आहे तिथे रस्ता झाला व त्यात घराची बरीच जागा गेली. आता घर अगदी छोटे व बोळकंडासारखे झाले आहे. पर्यायी जागा मिळते पण त्याला ६५ हजार भारावे लागतात. त्यामुळे ती घेता येत नाही. या बाई सर्व प्रकारची गाणी रचतात. पाळणे, ओव्या, पोवाडे, व साधी गाणी. आठवले की वहीत लिहून ठेवतात. त्यांच्या जवळ अशा सातआठ वह्या आहेत. यांच्या यजमानांना पण आपल्या बायकोच्या गाणी रचण्याचा अभिमान आहे. यांची मुलाखत व गाणी कोल्हापूरला ९.२.२००४ ला घेतली. | ||