Cast: मराठा / Maratha Village: कोळवण / Kolwan Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F Songs by Dide Venu (10) | वयः ४० शिक्षणः २ री मुलं ः नाहीत माहेरः कुळं व्यवसाय ःशेती ३ एकर. ८-१० पोती भात होतो. पिकः तांदूळ, गहू. उपपिकः हरभरा,मसूर. जोडधंदाः दूध विकणे. २ बैल ,१ गाय आहे. माहेरी आजी ,आई गाणी म्हणायच्या त्याचं ऐकून पोरीपोरी त्या म्हणत राह्यचं तेच रोजरोज ध्यानात धरायचं. सासरी जावा, मैत्रिणीकडून नवीन गळे शिकले . पूर्वी घरी कांडण करायचो, लग्नात, घरात डाळ, तांदूळ दळावसं वाटलं तर गाणं म्हणतो. करमणूक म्हणून गाणं म्हणावसं वाटतं देवावर, पांडूरंगावर, सीता, मावली, मुलीवर, भावावर, मुलावर गाणं म्हणायचे . देवाच्या विषयावर गाणं म्हणायला आवडते. माया दाटून आली की, देवाची आवड दाटून आली की गाणे म्हणते. सारखं घोळवून डोक्यात गाणं राहतं. रिकामं शेतावर बांधावर बसंल की गाणं तयार करते. देवाची गाणी जास्त करुन तयार करते. ज्यांनी ऐकवलं त्यांच्या शब्दात बदल करत नाही. जावबाईना गाणं शिकवलं. शेजारच्या बायका आवडीनं गाण म्हणायला सांगतात. ज्यांना गाणंच येत नाही त्यांना ते कधी म्हणायला येणार असे विचारते. असं का विचारता असा प्रश्न केला असता पूर्वीचं चालू असांव असं वाटते. गाण्याच्या विशिष्ट गळ्यासंबंधी त्या म्हणतात,देवावर म्हणा,भावावर म्हणा, कोणत्याही विषयावर गळा बदलता येतो. घरची परिस्थिती ः घर १ खणाचे पे बांधीव आहे. विभक्त कुटुंब असून आर्थिक परिस्थिती बेताची आहे. भावाचा मुलगा आर्थिक मदत करतो. बाईना मूल होत नाही म्हणून एक मुकी मुलगी सवत म्हणून आणली आहे. पण गेल्या ५-६ वर्षात तिलाही मूल झालेले नाही. सवतीवर कामाचा बराच बोजा टाकला जातो. | ||