Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः ५० शिक्षणः ३री मुलगेः ४ मुलगी ः नाही माहेरः भरं व्यवसायः शेती २एकर. मुख्य पिकः तांदूळ, गहू. १५पोती भात होतो. जोडधंदा ः दूध विकणे, कोबंड्या पाळणे. माहेरी चुलत्या, शेजारणीचे ऐकून गाणं शिकले.सासरी सासू, नणंदा गाणं म्हणायच्या त्यांचं ऐकंल. लग्नात हळद दळताना, ऋषीपंचमीला दळताना गाणं म्हणतात. बरोबरीच्या बायका असल्यावर गाणं म्हणायला आवडते. इरशिरीनं गाणं म्हणावसं वाटतं. एकानं एक शब्द म्हटला तर पुढचा दुसरा शब्द म्हणावासा वाटतो. मनात गुणगुणत राहते त्यातूनच आठवते. शेजारणीला, नणंदेला गाणं शिकवलं. चार बायका दळण दळायला एकत्र बसल्या की गाणं पटापटा तयार होतं. देवावर सुनेवर, लेकावर, मालकावर गाणं तयार करते. दुसर्याच्या शब्दात बदल करते. लहानपणी आवडीनं दळणं दळतात तिथे जाऊन बसायचे. दुसरे म्हणतात की जुनं गाणं म्हणा. आमचे दिवस गेले तर 'तुम्ही कधी म्हणणार' असं ज्यांना गाणं येत नाही त्यांना म्हणते. हल्लीची मुलं लक्ष देत नाही. हे आवडत नाही. उलट त्यांना नांव ठेवते. सकणासाठी (लग्नाचा,चांगली गोष्ट) दुसरा गळा वापरतो. आवडीचा गळा जर दुसरीनें म्हटला तर त्या गळ्यावर गाणं म्हणते. घरची परिस्थितीः घर ५ खणाचं पे बांधकाम असलेले आहे. २ बैल, ३ म्हशी आहेत. एकत्र कुटुंब असून ३ सुना आहेत. २ मुले पुण्यात नोकरीला आहेत. घर खाऊनपिऊन सुखी आहे. गावातील मोजक्या घरात यांची गणना होते. | ||