Cast: मराठा / Maratha Village: आळबेळ / Aalbel Taluka: जुन्नर / Junnar District: पुणे / Pune Gender: F | वयः ६५ मुलगाः १ मुलीः ३ माहेर ः खरपुडी सवाष्ण शेतीः नाही. आता ४० वर्ष चिंचवडला रहातात. नवर्याला सरकारी दवाखान्यात वॉचमनची नोकरी होती. आता पेन्शन मिळते. या बाई गावी असताना भाजी विकत घेऊन शेजारपाजारच्या गावी हिंडून विकायच्या. पुढे नवर्याबरोबर चिंचवडला आल्या. तिथेपण ३० वर्ष डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकायचा धंदा केला. पुढे पायाला अपघात झाला म्हणून धंदा बंद केला. मुलापासून वेगळ्या रहातात. यांना १२/१३ नातवंडे आहेत. नाती नातु चांगले शिकलेत. यांना जात्यावरची हजारो गाणी येतात. म्हणी पुष्कळ येतात. यांनी सुईणपण केले आहे. अतिशय धीट वाटल्या. अजूनही गावाशी संबंध आहे. त्या म्हणाल्या की ८/९ वर्षाची असताना लग्न झाले. बाप लहानपणी वारला. भाऊ नाही. आईने सर्व केले. यांनीपण आईचे म्हातारपणी सर्व केले. त्यांची आई मरून ५/६ वर्ष झाली. यांना चिंचवड येथे ८.१.२००३ ला भेटलो. गाणी व मुलाखत त्याच दिवशी घेतली | ||