Cast: लिंगायत / Lingayat Village: इचलकरंजी / Ichalkaranji Taluka: हातकणंगले / Hatkangale District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ५५ मुलगेः ३ मुलगी ः १ विधवा शेतीः पाच एकर यांचे यजमान मुळचे इचलकरंजीचे. ते तरूणपणी तिथून एका मुलीला घेऊन पळून गेले म्हणून त्यांना परत इचलकरंजीला जाता आले नाही. ते मग सांगलीत राहीले व हरीपूर भागात शेती घेतली. या बाईंबरोबर संसार इथे सांगलीतच झाला. यांच्या मुलीचे लग्न झाले ते या बाईंच्या इच्छेविरूध्द. ती मुलगी लग्नानंतर बारा दिवसात मेली. तिला कोणताच आजार नव्हता. यांच्या यजमानांनी त्यानंतर हाय खाल्ली, त्यांना वाटले की बायको नको म्हणत होती तरी आपण मुलीचे लग्न केले. पैसै खर्च केला अशा विचाराने ते वारले. मुले लहान होती. या बाईंना चकरावून गेल्या सारखेच झाले. शेजारी पाजारी म्हणाले की,' मुलांकडे बघून दुःख आवर. नाही तर ही जागा जमीन कोण बघणार?' मग हिंमत बांधली. घर बांधले. शेती संभाळली. शेतीत नदीचे पाणी पंपाने घेतले. आता ऊस करतात. इतर पिके करतात. एक मुलगा वारला. त्याची बायको व एक मुलगा या बाईंजवळ रहातात. यांच्या घरातच पण इतर दोन मुलगे वेगळे रहातात. त्या दोघांना नोकर्या आहेत. शेती या बाई स्वतः काम करून, मोलाची माणसे घेऊन करतात. विधवा सून मदत करते. यांच्या कडे म्हशी आहेत. थोडे दूध आसपास विकतात. यांना जात्यावरील ओव्या, पाळणे, फेराची गाणी सर्व येते. आजही त्या गौरीची गाणी फेर धरून नाचू शकतात. यांना १८.१२.२००२ ला सांगलीत भेटलो. | ||