Cast: होलार / Holar Village: जाकापूर / Jakapur Taluka: कवठे महंकळ / Kavathe Mahankal District: सांगली / Sangli Gender: F | वयः ७० शिक्षण ः नाही मुलगा ः २ मुलगीः १ व्यवसाय ः शेती कोरडवाहू घरची परिस्थितीः या आता सांगली येथे सिध्दार्थ परिसरमधे रहातात. पायानी पांगळ्या झाल्या आहेत. यांचा मुलगा रस्त्यावर चांभार म्हणून बसतो.यांचे पहीले लग्न कोळ, ता. सांगोला, जि. सांगली मधे झाले होते. पण नवर्याने एक जोगतीण ठेवली होती म्हणून तिथे नांदल्या नाहीत. मग वडीलांनी या केंगर्यांशी लग्न करून दिले. लग्न झाले तेंव्हा केंगरे वयाने बरेच मोठे होते. त्यांची पहीली बायको वारली होती. त्यांचे वय मोठे असल्याने लक्ष्मीबाईंना दोनच मुले झाली. यांना एक सावत्र मुलगा आहे यांना जात्यावरची पुष्कळ गाणी येतात. यांनी काही गाणी बाबासाहेबांवर दिली. यांनी एक ओवी दिली विधवा आंबेडकर महाराजा सांडीला दहीभात त्यांच्या राणीने केला घात नंतर त्या म्हणाल्या की 'अशी बामणावर ओवी दिली मग नेऊ दे मला पकडून. मला नाही काही वाटत' इतर बाया लगेच मला विचारू लागल्या की तुम्ही पुस्तकात नाव छापणार का? या सगळ्या ओव्या छापणार का? त्यांना नीट समजावून सांगितल्यावर त्यांच्या मनातील भीती कमी झाली. यांना सांगलीत १७,१८ डिसेंबर २००२ला भेटलो व गाणी आणि मुलाखत घेतली. | ||