Cast: होलार / Holar Village: / Taluka: सांगोला / Sangola District: सोलापुर / Solapur Gender: F | वयः६० मुलगेः ३ मुलीः २ सवाष्ण व्यवसाय ः शेती कोरडवाहू यांच्या सासूकडून हे सर्व प्रकार शिकल्या. स्वतःपण गाणी रचतात. घरची परिस्थितीः परिस्थिती हालाखीची आहे. कष्ट करणे जरूरीचेच आहे. या बर्याच वर्षापासून सांगलीत सिध्दार्थ परीसर मधे रहातात. आजूबाजूला शेतात खुरपणी करण्यास जातात. सांगलीतील मंगल कार्यालयात भांडी घासण्याच्या कामास जातात. कार्यालयाचा मालक तरूण आहे त्याच्यावर गाणी रचतात. त्याची बायको प्रथमच गरोदर आहे तिच्यावर गाणी रचली आहेत. गाण्याचा फार नाद आहे. जात्यावरल्या ओव्या, फेराची गाणी, देवीची गाणी, अभंग, गवळणी, उखाणे, पाळणे हे सर्व प्रकार उत्तम म्हणता येतात. पाठांतर भरपूर आहे. आवाज चांगला आहे.या पंढरपूर, आळंदी पायी करतात. त्या म्हणाल्या की ,'वारीत अखंड गाणी म्हणत असते' यांना सांगलीला १७, डिसेंबर २००२ ला भेटलो व मुलाखत आणि गाणी घेतली. | ||