Cast: होलार / Holar Village: नागज / Nagaj Taluka: कवठे महंकळ / Kavathe Mahankal District: सांगली / Sangli Gender: F | वयः६५ मुलगेः २ मुलगी ः नाही विधवा व्यवसाय ः शेती कोरडवाहू आता सांगलीत सिध्दार्थ परीसर मधे रहातात. परिस्थिती दुबळी, मुलगे काम करातात. ही मंडळी साधारणपणे रस्त्यात बसून चपला बूट दुरूस्तीचे काम करतात. वाजंत्री वाजवण्याचे काम करतात. वाजंत्री वाजवण्याचे काम अर्थात वाजवण्याचे कसब असेल तर करतात. बाया मजुरी करतात. गाणी देण्याची व आम्हाला मदत करण्याची हौस होती. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला दोन घरी नेले. त्यापैकी एकजण भेटल्या नाहीत. ताराबाई हत्तीकर मात्र भेटल्या. या आम्हाला त्यांच्या गावी घेऊन जाण्यास तयार झाल्या होत्या. यांनी काही बाबासाहेबांची गाणी सांगितली. एकूण दुबळ्या परिस्थितीमुळे देवाचे पुष्कळ करतात. लक्ष्मीआई, यल्लमा, कारंडीआई, यांच्या जत्रांना जातात. यांच्यात आराधीपण पुष्कळजण आहेत. यांना सांगलीला १६,१७ डिसेंबर २००२ ला भेटलो व मुलाखत आणि गाणी घेतली. | ||