Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Tara (243) ◉ | वयः३६ शिक्षण ः ३री मुलेः३ मुली ःनाही शेती- १ एकर. पीकः तांदूळ, नाचणी, गहू. उपपिकः वरई. जोडधंदाः काही नाही. ओव्यांचे गळे सासरी आल्यानंतर नणंदा व जावांकडून शिकले. गरीब डोंगरी संघटनेचे कार्य गेली १० वर्षापासून करते. कोळवडे गटाचे प्रमुख असून ओवी संकलनात महाराष्ट्र्रत सहभाग घेते. घरची परिस्थितीः सिमेंट व मातीचा वापर करुन बांधलेले घर. छप्पर सिमेंटच्या पत्र्याचे. खाऊनपिऊन सुखी. बाईचा गावातील सामाजिक कार्यात सहभाग तसेच रोगाविषयी प्राथमिक औषधोपचार करतात . एक मुलगा पुण्यात नोकरीला आहे. नवरा मुबंईला मीलमध्ये कामाला होते पण मिलवाल्यानी संप केला संपानतंर गावाला आलो तर दीरांनी कपड्यानिशी बाहेर काढले. वमुल घेऊन मोलमजुरी करु लागले. मुलाखत १९९६ साली घेतली. | ||