Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: पौड / Paud Gender: F Songs by Kurpe Baba (100) | वय ः ८० शिक्षण ः नाही मुलगा ः नाही मुलगी ः १ माहेर सासर आकवले व्यवसायः शेती ५/६ एकर भात होतो. पिके तांदुळ गहु जोडधंदा दुध विकणे. माहेरी आईकडुन , भावजया गाणं म्हणायच्या ते शिकले सासरी शेजारणीच शिकले . लग्नाला सणाला गाणं म्हणतात. लोक कौतुक करतात म्हणुन गाण म्हणायच लेकीविषयी लई आवड होती गाण सारख गुणगुणायचे त्यातुन लक्षात राहायच गाण म्हणताना मया दाटुन येते भाऊ जवळ आल्यासारखा वाटतो दुसर्याची गाणी शब्दात उचांवुन म्हणायचे लेकीला शेजारणीला गाणी शिकवली स्वतःगाणी तयार करायचे जात्यावर बसले की आपोआप फुटते त्या येळेला जे मनात येईल त्यांच गाण म्हणायच देवाच आल देवाच आईच आल आईच गाण म्हणायच दुसरे म्हणायचे एवढ कस तुमच्या लक्षात राहायल ज्यांना गाणी येत नसत तिला याड.कव्हा तु शिकायची गाण्यातुन तिला बोलायची तुला गाण कस येत नाही जुन्या मानसाच कोणी ऐकत नाही त्यांच्या नवीन नकला निघल्यात अस नव्या पिढीविषय़ी त्या म्हणतात. हाळदीशिवाय दुसरा वेगळा गळा नसतो. घरची परिस्थितीः घर २खणाचे असुन कुडाच्या भिंती आहेत मुलगा नसल्याने घरजावई केला आहे. मुलीच निधन झाल्यापासुन कशातच मन रमत नाही एकर्त कुंटुं आहे आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. | ||