Cast: नवबौध्द / Navbaudha Village: तीनखेड / Tinkhed Taluka: सासर / Sasar District: छिंदवाडा / Chindvada Gender: F | वयः५० मुलगे ः २ मुलीः २ सवाष्ण यांची मुलगी त्यांना सारखी म्हणत होती की सांग अजुन ओव्या म्हणून पण चुलत सासुने दबाव आणला. त्या म्हणाल्या की माझ्या बहीणीला पुष्खळ ओव्या येतात. ती पण बरोबर आली होती. ती विहारात गेली होती. या म्हणाल्या की आम्ही आगगाडीने बिना तिकीट आलो. असे येण्याचे वर्णन त्या बाया करतात की आम्ही बाबासाहेबाच्या गाडीने आलो. म्हणजे बाबासाहेबांनी जी चळवळ केली त्यामुळे आता गाडीत कोणी आडवत नाही. विजया दशमीला दिक्षाभूमीनवर फुकट येता येते. गरीब माणसांना तिकीट काढून येणे शक्य नसते. यातर मध्यप्रदेशातून आल्या होत्या. यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २६.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||