Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: जळगाव जाणुर / Jalgaon Janur District: बुलढाणा / Buldhana Gender: F | वयः४० मुलगे ः १ मुलीः २ सवाष्ण व्यवसाय ः शेती४ एकर. कोरडवाहू त्यांचा नवरा व मुले आली नव्हती. सासू मुले संभाळण्यासाठी घरी थांबली. त्या म्हणाल्या पाऊस नाही. मला वाटते केस कापून भिक्षुणी व्हावे. म्हणजे संसाराची कटकट रहाणार नाही. त्यांची बहीण व जाऊ गोकर्णाबाई सकपाळ म्हणाल्या आता पुष्कळ बाया केस कापून भिक्षुणी होतात. तू झालीस तर त्यात एवढ विशेष काय आहे. अनिताबाईंना ओव्या पटपट आठवत नव्हत्या. त्या गोकर्णाबाईंना म्हणाल्या की मला आठवतात तशा मी सांगतेच आहे. हुरद्यात येतात त्या कशाला दडपून ठेवू. यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २५.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||