Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: सोनपेठ / Sonpeth District: परभणी / Parbhani Gender: F | वयः६५ मुलगा ः १ मुलगीः १ शेतः नाही. मजूरी मुलगा वारला. नवरा ८/९ वर्षापूर्वी वारला. आता मुली जवळ रहातात. आपणाला सोयर्याच्या दारात रहावे लागते याचे वाईट वाटते. स्वभाव चिडका आहे. पंढरपूरची वारी चार पाच वेळा केली. आता कधीतरी आळंदीला येतात. पण आता बसने येतात. आता ओव्या म्हणत नाही. पण त्या हुरद्यात खेळताहेत अस म्हणाल्या. तिथे शेजारी लाऊड स्पीकर लागला होता. त्यामुळे लक्षात येणारी गाणी जात होती. त्या चिडून म्हणाल्या की या पोरांनी हे मुद्दामच लावलय. त्या आवाजाचा फारच त्रास होत होता. त्यांना लोखो ओव्या तोंडपाठ आहेत. आंबेडकरांवरच्या ओव्या सुध्दा पुष्कळ येतात. त्या म्हणाल्या की दुःख मनात साठलय पण इलाज नाही. ओव्या देण्याची मोठी आवड वाटत होती. सारख म्हणायच्या की अजून एक पान भरून दे.. परत ओव्या घ्यायला या आस आमंत्रण देत होत्या.आता या आंबेजोगाई येथील भीमनगर मधे रहातात. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||