Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: नांदेड / Nanded District: नांदेड / Nanded Gender: F | वयः६० मुलगाः १ मुलगीः १ विधवा व्यवसाय ः शेती नाही. मजूरी करतात या एकट्याच करून खातात. नवरा मरून पाच वर्ष झाली. मुलगा विचारत नाही. बापाच्या मौतीलापण आला नाही. मुलगा सासुरवाडीच्या मंडळींना विचारतो. त्यांच माहेर विष्णुपुरी. तिथे छोटे धरण आहे. या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परीपाठ आहे. लिहीता वाचता येत नाही. रायबोलेंनी आदल्या दिवशी सांगितले की पुण्याच्या बाई येणार म्हणून आंबेडकरांवरील ओव्या चंद्रकलाबाईंनी कागदावर लिहून काढल्या होत्या. अनुबाई म्हणाल्या की मला कागदावर लिहिता येत नाही. मग माझे नाव कसे लिहीणार तुम्ही. सगळ्या ओव्या चंद्रकलाच्या नावावर देणार का? त्यांना थोडे मौखिक परंपरेबद्दल सांगितले. त्यांचे समाधान झाले. त्यांचे नाव यावे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांना भरपूर ओव्या येत होत्या. प्रथम आंबेडकरांवरील सांगीतल्या. मग म्हणाल्या की फ्क्त याच सांगायच्या का? इतर पुष्कळ आठवतात. लहानपणी दळण दळल आहे. त्यांना सांगितले कोणत्या पण सांगा. त्यांनी पुष्कळ ओव्या सांगितल्या. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||