Cast: नवबौध्द / Navbaudha Village: हाळी / Hali Taluka: उदगीर / Udgir District: लातुर / Latur Gender: F | वयः ४० व्यवसाय ः शेत नाही. मजूरी करतात ओव्यात येतो तो इतिहास घडलेलाच असतो असे नाही. मग आम्ही ओव्या दिल्या तर कुणी खरखोट तर करायला येणार नाही ना? याचा त्रास होणार नाही ना? कोणी विचारायला तर येणार नाही ना की हे कधी घडले. आम्ही तुमच्या नावावर छापणार असे म्हटल्यावर तिला भीती वाटू लागली. आंबेडकराची पोलाद लोखंडाहुन जाड होते भीमबाबाची विटबंना करणारे बीन बापाचे होत हे गाण सांगितल त्यावेळी तिथल्या तरूणानी त्यांना दबावात घेतल. आस कशाला म्हणाव म्हणाला. यांचे एक वस्तीतले महीला मंडळ आहे. या कधी कधी एकत्र जमतात. यांची मुलाखत व ओव्या १८.१०.२००१ला घेतल्या. | ||