Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नळदुर्ग / Naldurg Hamlet: वसंतनगर इंदीरा स्लम / Vasantnagar, Indira slum Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः४५ मुलगेः ३ मुलीः ३ यांचे वडील तमासगीर होते. त्यांचे नाव लक्ष्मण गायकवाड. तीन भाऊ त्या पैकी एक मुंबईत असतो. एक सोलापुरात शिक्षणाधिकारी आहे. धाकटा भाऊ तमासगीर होता. पण भावांना ते आवडत नव्हते. तो वारला, बाप वारला त्याचे फार दुःख झाले. तीन बहीणी आहेत. एक मुंबईला असते. ती शिक्षीका आहे. तिचा मुलगा डॉक्टर झाला आहे. एक बहीण इथे गावीच शेती करते. या म्हणाल्या की वडील चाली म्हणायचे त्या चाली जात्याच्या ओव्यांना बरोबर बसत. सुखवंता कांबळे यांची बहीण या बालवाडी शिक्षीका आहेत. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||