Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: भीम नगर / Bhim Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः७० मुलगेः ३ मुलगीः १ शेतीः ३० एकर. त्यात निरनिराळी पिके येतात. या बाई स्वतः शेतीत खूपच कष्ट करतात. घरात म्हैस आहे. एक मुलगा पुण्यात काम करतो. दुसरा मुलगा गवंड्याचे काम मुंबईत करतो. एक गावीच असतो. तो फारसा कर्तृत्ववान नसावा. यांचा नवरा वाघ्या आहे. यांचे वडील तमासगीर होते. त्यांचे नाव लक्ष्मण गायकवाड. तीन भाऊ त्या पैकी एक मुंबईत असतो. एक सोलापुरात शिक्षणाधिकारी आहे. धाकटा भाऊ तमासगीर होता. पण भावांना ते आवडत नव्हते. तो वारला, बाप वारला त्याचे फार दुःख झाले. तीन बहीणी आहेत. एक मुंबईला असते. ती शिक्षीका आहे. तिचा मुलगा डॉक्टर झाला आहे. एक बहीण इथे गावीच बालवाडीची शिक्षीका आहे. यांचा नवरा वाघ्या त्याला काम मिळते, त्या मुळे यांनी मुसलमानाची जमीन खरेदी केली असे इतर बाया म्हणत होत्या. या बाई ओव्या म्हणण्यासाठी प्रसिध्द आहेत. आतासुध्दा शेतात काम करताना दिवसभर ओव्या म्हणत असतात. यांना ओव्यांच्या पुष्कळ चाली येतात. त्या त्यांनी वडलांकडून शिकल्या. यांची बहीण शेवंता भालेराव म्हणाल्या की वडील चाली म्हणायचे त्या चाली जात्याच्या ओव्यांना बरोबर बसत. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||