Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: वैष्णवनगर / Vaishnavanagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ४५ मुलगेः ३ मुलीः २ सवाष्ण शेतीः १५ एकर घरची परिस्थिती उत्तम आहेच एकत्र कुटुंब आहे. हे एकूण तीन भाऊ एकत्रच, पैकी या थोरल्याच्या पत्नी, मघला पण तिथेच रहातो. तिसरा भाऊ अपघाताने वारला. त्याची पत्नी नळदुर्ग येथे सेवादलाच्या आपले घर या अनाथ मुलांसाठी चालवलेल्या वसतीगृहात गृहमाता म्हणून काम करते यांचा सासरा शेतकरी कामकरी पक्षात आहे. तो पूर्वी उपनगाराध्यक्ष होता. आता अंथरूणाला खिळून आहे. घरात जुने वातावरण आहे. अजून घरातल्या बाया दुकानात जात नाहीत. धाकटीच्या वडलांनी मध्यस्ती करून नोकरी लावली. दोन कापडाची दुकाने आहेत. पण मुलांच्यात कर्तृत्व नाही. शेतीतले पण काम करता येत नाही. बाया शेतीत काम करू शकतील पण त्यांनी घराबाहेर पडायचे नाही. या बाईंचे माहीर नळदुर्ग पासून चार किलोमिटर अंतरावर आहे. यांना खूपच गाणी येतात. गाणी देण्याचा उत्साह पण होत. त्या म्हणाल्या गावी अजूनही गाणी म्हणण्याचा सराव आहे. इथे फार म्हटली जात नाहीत. यांची मुलाखत व गाणी ५.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||