Cast: मुस्लीम / Muslim Village: / Hamlet: वसंतनगर इंदीरा स्लम / Vasantnagar, Indira slum Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ५५ मुलगेः २ मुलीः २ सवाष्ण शेतीः नाही. या तालुका काँग्रेस महीला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. यांना भगीनी निवेदिता बँकेने पुरस्कार दिला आहे. हमीद दलवाई प्रतिष्ठानने पुरस्कार दिला आहे. या स्वतः गाणी रचतात. इथे दिलेली बरीच गाणी त्यांनी आमच्या समोरच रचली. या रहातात तिथल्या झोपडपट्टीत यांचे कार्य आहे. बाबासाहेबांवर ओव्या मिळतील का म्हणून विचारल्यावर लगेच काही महार बायांकडे घेऊन गेल्या. त्या महारबायांची घरे अगदी छोटी. तिथे बसायलाच जागा नव्हती. मग रस्त्यात बसून रस्त्यातील दिव्याच्या उजेडात ओव्य़ा लिहून घेतल्या. त्यांनी पण तिथेच बसून ओव्या रचल्या. रात्र झाल्याने व वादळाची सुरवात झाल्याने फार ओव्या लिहून घेता आल्या नाहीत. यांची मुलाखत व गाणी ५.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||