Cast: न्हावी / Barbar Village: नळदुर्ग / Naldurg Hamlet: मराठा गल्ली / Maratha Galli Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ७५ परिस्थितीः वाईट मूलबाळ नाही. लग्न झाल्याबरोबर नवर्याने टाकून दिले. सर्व जन्म माहेरी काढला. अनसाबाई जाधव म्हणाल्या की जशी दारीची तुळस पवित्र तसा हिचा जन्म गेला. जन्मभर शेत मजुरी केली. आता सुध्दा मजुरीने जावे लागते. भाऊ कधी मधी मदत करतात.कृष्णाबाई टेकाळे म्हणाल्या की आम्ही दोघी मैत्रीणी आहोत. याच गावात जन्मलो. इथेच एकत्र म्हातार्या झालो. काम सुध्दा एकाच शेतात करायचो. या बाईंना पुष्कळ ओव्या येतात. सर्व प्रकारची गाणी येतात. एक निरिक्षण आहे की ज्या बाया अशा गाण्याचा छंद जास्त असतो. कदाचित स्वतःची परिस्थिती अभिव्यक्त करण्याचा तो एक मार्ग असावा. यांची गाणी व मुलाखत नळदुर्ग येथे ४.१०.२००१ व ५.१०.२००१ला घेतली. | ||