Cast: मराठा / Maratha Village: नळदुर्ग / Naldurg Hamlet: मराठा गल्ली / Maratha Galli Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः६८ सवाष्ण पार्वतीबाई जाधवांची जाऊ. पुष्कळ ओव्या येतात. म्हणण्याची हौस वाटत होती. एकदम त्यांच्या घरी गेल्यामुळे ओव्या आठवत नव्हत्या त्याचे त्यांना वाईट वाटत होते. सतत म्हणत होत्या की मागच्याच वर्षी कोणाच्या लग्नात खूप गाणी म्हटली. त्या म्हणाल्या की आता रोज जात्यावर दळत नाही मग गाणी आठवत नाहीत. लग्नाची हळद दळताना पुष्कळ जणी एकत्र येतो व गाणी म्हणतो. हळद दळतो. एकीमेकींच्या नादानी गाणी आठवतात. त्यावेळी मोठा उत्साह वाटतो. त्यांनी स्वतः जाऊन उत्साहाने बाई महाबोले या वृध्द महीलेला बोलावून आणले. अपणाकडे आपली गाणी लिहून घ्यायला कोणी आलय तर त्यांना मदत करावी असे त्यांना मनापासून वाटत होते. नळदुर्ग येथे ४.१०.२००१ ला त्यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||