Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: वाडीया हॉस्पीटल फॉरेस्ट / Wadia hospital, forest Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ६० मुलगेः ३ मुलगी ः १ व्यवसायः या बाई भाजी विकतात. घरची परिस्थिती ः उत्तम आहे नवरा विष्णु मिलमधे होता. यांची सर्वीस पुरी होण्या आगोदर मिल बंद पडली. मोठा मिलीटरीत आहे. मुलगी बँकेत आहे. धाकटा काम करतो. मघला याच्या बरोबर भाजी विकतो. त्या म्हणाल्या हा टी. व्ही आला तस सगळ गाण बंद झाल. पाळणे नाही, फेर नाही, ओव्या नाहीत काही नाही. नुसती धांगडधिंग्याची गाणी. टी. व्हीत दुसर्या देशांची पाखर,शेती माणस दाखवतात त्याचा काय उपयोग. या बाईंच्या शेजारी शिवचरणबाई रहातात. त्या अंगणवाडीच्या सुपरव्हायझर आहेत. आमचा ओव्या गोळा करण्याचा उद्देश त्यांना पटला. त्यांनी गंगुबाईंना गाणी म्हणायला सांगितली. शेजारच्या मुलीने लिहून घेतली. तो कागदच त्यांनी दिला. आम्ही सायंकाळी कागद घेण्यास गेलो तेंव्हा म्हटले की आम्ही उतरवून घोतो. तुम्ही सांगा. तेंव्हा म्हणाल्या की आता टी. व्ही. चा आवाज आहे. शांतपणे पोरीला सांगून कागद तयार करीन व तुम्हाला धाडून देईल. मला पुष्कळ ओव्या येतात २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||