Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: नवी बुधवारपेठ / Navi Budhavarpeth Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ८० मुलगा ः नाही. मुलगीः १ घरची परिस्थितीः नवरा विष्णुलक्ष्मी गिरणीत कामाला होता. गिरणी बंद पडल्यावर फार हाल झाले. लाकडे फोडण्यचे काम केले. त्यात मोठा दुष्काळ पडला. त्यात नवरा मेला. पाच भाऊ मेले. सर्व दुःख मोठे. गाण म्हणत नाही. मी सारखी रडायची. मुलगी मला म्हणाला की मला तर भाऊच नाही मग मी किती दुःख करावे. तिने असा शब्द वापरला म्हणून पुन्हा दुःखाचा शब्द उघड बोलत नाही तरी हुरद्यातले दुःख जात नाही. तुझा (हेमा राईरकर) चेहरा पाहीला ही मुलगी (सुमीत्रा जाधव) आली मग गाण म्हटले. ओवी सांगितली तुझा माझा भाऊपणा पडू नये पडला/ तुझ्या गुणाला जोडला. त्या म्हणाल्या मी शेतीचे पण काम केले आहे. दळून हाताला घट्टे पडले. गावी भंडारा असला की खूप दळण असे. मी पाच पायली व माझ्या सासूने पाच पायली दळण एका रात्री रात्रभर बसून दळले. रात्रभर गाणी गायली. मग सकाळी स्वैपाक सुरू केला. आता त्या मुलीत रहातात. मुलीची मुल चांगली शिकलीत. त्यांच्य़ा नातवाच्या मनात नव्हत आजीनी गाणी सांगावी म्हणून. मग आम्ही निघताना म्हणाल्या की परत या मी गाणी सांगीन. यांची गाणी व मुलाखत २३ सप्टेंबरल २००१ला घेतली. | ||