Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: नवी बुधवारपेठ / Navi Budhavarpeth Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ७० मुलगे ः ४ मुलगीः १ सवाष्ण घरची परिस्थिती- नवरा शिक्षक होता. आता निवृत्त. निवृत्ती वेतन मिळते. चारी मुलगे शिकून नोकरीला आहेत. एकाच घरात चार खोल्या करून चारी जणांना वेगळे काढले आहे. या व यांचे यजमान धाकट्या जवळ रहातात. धाकट्याला वडलांच्याच जागेवर शिक्षक म्हणून कामाला लावले. म्हणून त्याने आई वडलांचे करावे असे ठरले.यांचे सासरे गिरणीत कामाला होते. या रहातात तिथे बाजूने पूर्वी शेती होती. या शेतमजुरी करायच्या. खुरपणे, टोमॅटो लावणे, तोडणे अशी कामे करायच्या. पुष्कळ कष्ट केले. सहा दीर आहेत. सासु सासरे असताना एकत्र होते. सर्व दीर पण नोकर्यात होते. सासु जावा अशा सगळ्या मिळून दळण दळतयांना अक्षर ओळख नाही याचे वाईट वाटते. या म्हणाल्या आंबेडकरांच्या ओव्या येत नाहीत. दुसर्या येतात. माझी इच्छा आहे ओव्या देण्याची.ओव्या देण्याची फार हौस वाटत होती. प्रथम मनावर दबाव यायचा. प्रत्येक ओवीत आंबेडकरांचे नाव घालण्याचा प्रयत्न करायच्या. मग बोलून त्यांच्या मनावरचे दडपण दूर केले. फक्त आंबेडकरांच्याच ओव्या घ्यायच्या असे नाही. दुसर्या पण घ्यायच्यात असे पटवल्यावर मोकळ्या झाल्या. इतर पुष्कळ ओव्या सांगीतल्या. यांचे सुनांशी संबंध चांगले आहेत. यांचा नवरा कडक आहे. तो घरात नव्हता त्या मुळे ओव्या दिल्या. मधे मुलगा येऊन गेला अर्थात त्याने दबाव आणला नाही. त्याने आपल्या आईला विचारले की ओव्या सांगतेस त्यांचा अर्थ कळतोय का. नाहीतर कायपण सांगशील (आईच्या शहाणपणाबद्दल शंका येणे हा अर्थात त्याचा दोष नाही. त्याच्यावर संस्कारच तसे. आजुबाजुचे वातावरण पण तसेच) या म्हणाल्या की आता सिनेमा, टी व्ही झालय मी जर कधी ओव्या म्हटल्या तर नाती हसतात. मला मनातून खूप हौस आहे ओव्या म्हणायची. यांच्या सुनेची बहुधा आम्हाला जेवायला घालायची इच्छा होती पण ते महार असल्याने आम्ही खाऊ की नाही याची त्यांना खात्री वाटली नाही. म्हणून खायला दिले नाही. २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||