Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: नवी बुधवारपेठ / Navi Budhavarpeth Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ३० शिक्षण ः ९ वी मुलगाः १ मुलीः २ सवाष्ण माहेर ः श्रीपूर माळशीरस शेजारी आहे. या नववी पर्यंत शिकल्या. चांगले स्थळ आले म्हणून वडलांनी लग्न केले. यांना थोड्या फार आंवेडकरांवर ओव्या येत होत्या. चंदनशिवे सोनाबाई त्या चंदनशिवेबाईंना समजावून सांगत होत्या की तुम्हाला येतात त्या ओव्यांत आंबेडकरांचे नाव घालायचे. नंतर त्यांनी तसेच करून काही ओव्या दिल्या. त्यांच्या सासूने रूखमीणीच्या ओव्या दिल्या होत्या तर त्यामधे रूखमीणी ऐवजी रमाबाईंचे नाव घालून ओव्या दिल्या. इतर ओव्या आईच्या, सासूच्या ऐकुन पाठ होत्या. यांना शिक्षणाची फार आवड आहे. पुढे शिकावे असे वाटते. त्या म्हणाल्या की सकाळी ११ नंतर मी मोकळी असते. मला वाटते की अर्धे राहीलेले शिक्षण पुरे करावे. नवर्याला पण तसेच वाटते. पण सासुसासरे विरोध करतात. नवरा म्हणतो की विनाकारण भांडण नको. या बाईंनी आम्ही ज्या आंबेडकरांवर ओव्या घेतल्या होत्या त्या लिहून घेतल्या. त्या म्हणाल्या की मी पुस्तके वाचते. टी.व्ही. बघायला आवडत नाही. दुसर्या घरी नेले व तेथील दोन स्त्रियांना ओव्या देण्यास प्रवृत्त केले. या चांगल्या स्वभावाच्या बाई म्हणून प्रसिध्द आहेत. यांचा नवरा पोलीसात अधिकारी आहे. तो पण थोडे बहुत कार्य करतो. यांचा आजूबाजूस दबदबा आहे. या सखुबाई जाधव यांच्या सूनबाई. त्या म्हणाल्या की तुम्ही सांगितले की हे जुने बुडून जाईल. बायांनी निर्माण केलेली गाणी नाहीशी होतील हे मला पटले. आता लोक काही कारणांनी जुन्या कडे वळतात. (लोक जुन्याकडे वळतात असे या म्हणाल्या. बहुतेकदा जुन्याकडे वळणे या कडे विश्लेषणात्मक दृष्टीने पहाता येत नाही. जुन्याकडे म्हणजे कोणत्या जुन्याकडे वळायचे त्याची कारणे काय इतका विचार करायला संधी मिळत नाही. दुर्दैवाने आज पुरोगामी सामाजिक चळवळ अशी संधी उप्तन्न करून द्यायला कमी पडते. सामाजिक व सांस्कृतिक बाबींची व संधीसाधु राजकारणाची गल्लत होते. ही बाब फार गंभीर आहे) या सखुबाई जाधवांच्या सूनबाई. २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||