Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: नवी बुधवारपेठ / Navi Budhavarpeth Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ७० मुलगेः ३ मुलीः २ सवाष्ण घरची परिस्थितीः यांचा नवरा म्युनीसीपालीटीत कामाला होता. एक मुलगा पोलीस आहे. एक प्रोफेसर आहे. एक कॉट्रॅक्ट घेतो. पोलीस आहे तो मुलगा कार्यकर्तापण आहे. नोकरी संभाळून कार्य करतो. या व यांचा नवरा पोलीस मुलाजवळ रहातात. सर्व मुले वेगळी रहातात. या आता जिथे रहातात तिथे जवळपास पूर्वी शेती होती. या शेतात मजुरी करायला जायच्या. सासुबरोबर दळण दळायच्या. त्यामुळे पुष्कळ गाणी येतात. या म्हणाल्या की आम्हाला आंबेडकर फिंबडकरांची गाणी येत नाहीत. मग त्यांची सून म्हणाली की तुम्हाला जी गाणी येतात त्यातच बाबासाहेबांचे नाव घालायचे. मग त्यांनी बाबासाहेबांवर गाणी सांगीतली. इतर पण पुष्कळ ओव्या सांगीतल्या. या इथल्या बहुतेक बायांचे नवरे गिरणीत म्हणा, म्युनीसीपालीटीत म्हणा, रेल्वेत म्हणा कामाला होते. काही बायांच्या बाबतीत त्यांचे सासरेसुध्दा कामाला होते. म्हणजे दोन पिढ्यांपासून पुरूष कामाला लागले होते. त्यांचे काम जरी शिपाई वगैरे साधे असले तरी त्यांच्यात थोडीफार मध्यमवर्गीय मानसिकता आली. स्त्रिया जरी मजुरीच्या कामाला होत्या तरी नवरा नोकरी करतो. तो फारसे बाहेर जाऊ द्यायचा नाही. नोकरी करतो ही प्रतीष्ठेची बाब. याचा परिणाम म्हणून घरातील स्त्रियांनी आंबेडकर चळवळीत भाग घेतला नाही. त्या चळवळीवद्दल त्यांना माहीती आहे. तशी थोडीफार समज सुध्दा आहे. म्हणून बहुतेक म्हणाल्या की आंवेडकरांवर गाणी येत नाहीत. अर्थात काही वयस्क बाया ज्यांचे नवरे नोकरीत होते त्यांना चळवळीबद्दल गाणी ठाऊक होती. भीमबाई सिध्दगणेशां सारख्यानी तर तुरूंगवास सुध्दा भोगला.नव्या तरूण मुलींना मात्र आंबेडकरांवर गाणी यावी असे वाटते. आता आंवेडकरांवरील गाणी, उखाणे यांची पुस्तके निघाली आहेत. आंबेडकरांवरचे पाळणे फार पॉप्युलर असावेत. कारण प्रत्येक ठिकाणी पाळणे देऊ का अशी विचारणा होई. पाळणे म्हणणारी बाई बोलवत. ती बाई पुस्तक घेउन येई. ज्यांचे नवरे नोकरीला त्यांना निवृत्ती वेतन मिळते. त्यामुळे म्हातारपण सुखात जाते. ज्यांचे नवरे गिरणीत होते व ज्या गिरण्या बंद पडल्या त्या कुटुंबाचे मात्र हाल झाले. त्यातून ज्यांची मुले शिकली व परत कामाला लागली व ज्यांना पिण्याच्या सवई लागल्या नाहीत त्यांची परिस्थिती चांगली आहे. या बाईंनी व यांच्या नवर्याने मुलग्यांना शिकवले तरी यांच्या मुली निरक्षर आहेत. २३ सप्टेंबर २००१ ला यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||