Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: नवबौध्द / Navbaudha Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: सोलापूर / Solapur District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः ६५ मुलगे ः ४ चार मुली ः २ माहेर ः मलीक पेठ सासर ः पांडवाची पोफळी दोन्हीही मोहोळशेजारी. विधवा. घरची परिस्थितीः नवरा रेल्वेत होता. नवर्याला शेतात काम करत असताना साहेबानी हाताला धरून नेऊन रेल्वेत कामाला लावले. त्यावेळेस नोकर्या सहज लागत.आज पैसे देऊनही नोकरी मिळत नाही.मोठा मुलगा रेल्वेत लागला. तो त्याची बायको रेल्वेच्या क्वार्टर मध्ये रहातात. दुसरा एक मुलगा पण लग्न करून वेगळा रहातो. धाकट्याच पण लग्न झाल आहे. इतर मुलांना कायम नोकर्या लागत नाहीत. तिसर्या नंबरचा होमगार्ड मधे जातो. पण कायम नाही. धाकट्याची बायको शिवण शिवते. एक मुलगी विधवा आहे. तिला एकच मुलगा आहे. तिचा नवरा तो लोचनाबाईंच्या भावाचा मुलगा. तो रेल्वेत नोकरीला होता. आता त्याच्या जागी मुलगा कामाला लागणार आहे. नवर्या बरोबर एक महीना रेल्वेतून प्रवास केला. सर्वांनी मिळून म्हणजे रेल्वेत काम करणार्या मित्रांनी पूर्ण डबा आरक्षित केला होता. खाण पिण, झोप, कपडे वाळवणे सर्व डब्यात केले. नेपाळपर्यंत प्रदेश पाहीला. या अजून काठापदराची लुगडी नेसतात. चोळी घालतात. त्या म्हणाल्या की अजून कधी अंगाला साबण लावला नाही. शिककाईचा वापर. कपडे धुण्यास सुध्दा साबण नाही. काळी माती लावून कपडे धुवायचे. पूर्वी शेतीत पुष्कळ काम करावे लागे. पुष्कळ गाणी येतात. २२ ता गाणी सांगीतली व परत दुसर्या दिवशी बोलावले. त्या दिवशी गाणी आठवून ठेवली होती. आम्ही परत २४ ता. गेलो. त्यादिशीपण खूप गाणी सांगीतली. त्यांच्या मुलीने, व शेजारणीने उखाणे सांगीतले. त्यांना सांगण्याची हौस वाटत होती. पण जात्यावरची गाणी येत नव्हती. शेजारीण तरूण आहे. ती लोचनाबाईंना सांगत होती की पुढच्या वेळी यांना बाबासाहेबाची गाणी द्या. २२व २४ सप्टेंबर २००१ ला यांची मुलाखत व गाणी घेतली. | ||