Cast: सुतार / Sutar Village: म्हात्रेवाडी / Mhatrevadi Taluka: भूम / Bhum District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ६५ मुलगेः ५ मुलीः २ विधवा व्यवसायः नवरा सुतारी काम करायचा. बलुते मिळायचे. नवरा वारला. फार दुःख झाले. दुःख विसरण्यासाठी पंढरपुरला आणले. त्या आहेव मरणाची गाणी सांगू लागल्या तेंव्हा त्यांना रडू येऊ लागले. मग त्यांनी गाणी सांगितली नाहीत. तीन मुलगे गावाला असतात. दोन मुलगे व एक मुलगी वडगाव बु. पुण्याच्या शेजारी रहातात. तिथे फर्निचरचे दुकान आहे. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती.वाखरीचे रिंगण बघण्यासाठी वाखरीत गेलो होतो. त्यावेळी यांची गाणी व मुलाखत २९ तारखेला घेतली | ||