Cast: मातंग / Matang Village: / Taluka: अकोट / Akot District: अकोला / Akola Gender: F | वयः३५ मुलगेः २ मुलगी ः १ व्यवसाय ः शेती एक एकर जमीन कोरडवाहू ज्वारी व पराडी (कापूस) करतात. ते पुरेसे नाही. मजुरी करतात. आई कडून गाणी शिकल्या. पहिल्यांदाच पंढरपूरच्या यात्रेला आल्या. येताना आगगाडीने बिना तिकीट आल्या. त्यांचा भाऊ अपंग आहे तो पंढरपूरला येतो. त्याच्या बरोबर आल्या. त्यांचे म्हणणे कसे पोहोचलो पंढरपूरला ते कळलेच नाही. देवानेच बोलावले. जाताना देवच बघेल.शिवलिंग धर्मशाळेत राहील्या होत्या. भावावरून गाणे म्हणताना डोळ्याला पाणी येत होते. यांनी नंतर काही दुसरी गाणी पण दिली. आवाज अतिशय गोड आहे आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||